भारतीय कोल्हापूर मंचच्या संस्थापिका लेखिका कवयित्री रोहिणी पराडकर लिखित काव्यरचना
चल गं आई गावाला
चिंच बोर खाऊ या
झुकझुक गाडीत बसूया
मामाच्या गावाला जाऊया
निसर्गरम्य सौंदर्यात वसे
मामाचे गाव डोंगरावर
नाही गाड्यांची वर्दळ
रानमेवा खाऊ माळावर
विहिरी तलावात उड्या
सवंगड्यांसह मारु या
रानोमाळी स्वच्छंदी
फेर फटका मारु या
मामी माझी सुगरण
करी चविष्ट शिकरण
सातच्या आत घरात
आजोबांची शिकवण
टायरला गोल फिरवू
कैऱ्या पाडून नेम धरु
मोतीसंगे खेळ खेळू
सायकलवर रपेट करु
बैलगाडीची मजा न्यारी
बैलांसंगे दोस्ती माझी
रात्री छान छान गोष्टी
सांगून थोपटते आजी
सौ.रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर 9767725552