जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ संजना जुवाटकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना
काय करावे.. कसे करावे? मनास येते नुसती मरगळ
कधी ना कधी येते नशिबी प्रत्येकाच्या हिरवी सळसळ
कष्ट करोनी किती राबते दिवसाराती घरट्यासाठी
गृहिणी नसते तरी उभारत, कधी..कुठे ..अन् कसली चळवळ
मुकेपणाने बांधत असते ओल्या गाठी आठवणींच्या
सुटता ताबा पापण्यांतुनी ओघळते ती हळवी घळघळ
मात करावी दुःखांवरती विसरुनी चरे, खपल्या साऱ्या
मुक्तपणाने नभी उडावे हवी कशाला नसती भळभळ
घाम गाळुनी भरेल जेव्हा यशपुर्तीची गंधित ओंजळ
सभोवताली सुटेल तेव्हा कर्तव्याचा सुंदर दरवळ
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.