सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात शांत संयमी नेतृत्व म्हणून प्रवास सुरु झाला तो कुडाळ येथील रणजित देसाई या युवा नेतृत्वाचा…!
आपल्या वडिलांचा राजकीय वारसा घेऊन राजकारणात अल्पावधीतच आपल्या बुद्धीची आणि राजकीय परिपक्वतेची छाप सोडली ती रणजित देसाई यांनी…!
जिल्ह्यातील राजकारण आक्रमकतेची जोड घेऊन चालणारे असले तरी संयमाने लोकांचा विश्वास संपादन करत आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्हावासीयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारा मुत्सद्दी राजकारणी म्हणून युवा नेतृत्व रणजित देसाई यांच्याकडे पाहिले जाते.
व्यवसायाने बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून ओळख असणारे रणजित देसाई यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. सामाजिक क्षेत्रात काम करताना जनहीताला प्राधान्य देत एक आदर्श आणि हुशार राजकारणी म्हणून रणजित देसाई यांनी लोकांच्या हृदयात शिरकाव केला. अल्पावधीतच कुडाळ बरोबरच जिल्ह्यात त्यांचे नाव सर्वमुखी होऊ लागले. पिंगुळी मतदारसंघातून पहिल्याच निवडणुकीत यश मिळाल्याने त्यांचा राजकीय प्रवास यशाच्या दिशेने होत गेला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा रणजित देसाई यांच्यावर प्रचंड विश्वास आणि त्या विश्वासाला रणजित देसाई नेहमीच खरे उतरले. अल्पावधीतच जिल्हापरिषदेतील हुशार, कल्पक, बुद्धिमान सदस्य म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या निवडणुकीत त्यांना आपला पिंगुळी मतदारसंघ सोडून नेरूर मतदारसंघात उभे राहावे लागले,परंतु आपल्या लोकप्रियता आणि कामाच्या जोरावर तिथूनही रणजित देसाई यांनी बाजी मारली. सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी नारायण राणे यांनी दिली आणि त्यावर रणजित देसाई देखील खरे उतरले.
जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत त्यांनी नावलौकिक मिळवला. जिल्हा परिषद कृषी सभापती म्हणून देखील त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुडाळ येथे आयोजित केलेला कृषी मेळावा आणि पशुपक्षी प्रदर्शन यामुळे रणजित देसाई यांच्या कल्पक बुद्धीची चुणूक संपूर्ण जिल्ह्याने पहिली. त्यांनी भरवलेला कृषी प्रदर्शन मेळावा कमालीचा यशस्वी झाला होता, शेतकऱ्यांनीही त्यांना दाद दिली होती. त्यामुळे शेतीप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा केवळ उद्योगच नव्हे तर शेती, कृषीच्या माध्यमातून देखील होऊ शकतो हे रणजित देसाई यांनी दाखवून देत एक वेगळा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करणारा रणजित सारखा कार्यकर्ता दुर्मिळच….!
रणजित देसाई यांच्या लोकप्रियतेमुळे दत्ता सामंत यांनी कुडाळ मधून माघार घेतल्यावर ऐनवेळी रणजित देसाई यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी सोपविली गेली होती. वैभव नाईक यांच्या विरोधात लढताना त्यांनी जोरदार टक्कर देत विरोधकांना घाम फोडला होता. अल्प मतांनी ते पराभूत झाले तरी कुडाळ मतदारसंघातील लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केले. गेले दीड दशक राजकारणात असताना देखील निष्कलंक राजकारण आणि उत्तम कार्य यामुळे एक निस्वार्थी, निर्गवी राजकारणी म्हणून रणजित देसाई यांच्याकडे पाहिले जाते.
विविध शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, मोठमोठ्या लोकांशी जवळचे संबंध असलेले रणजित देसाई कार्यकर्त्यांमध्ये रमतात, त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अशा या धुरंदर युवा नेत्याला *संवाद मीडिया कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…*