अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश अंतर्गत ठाणे जिल्हा विभाग आयोजित दुसरे पी सावळाराम साहित्य संमेलन डोंबिवली नगरीमध्ये दिमाख्यात साजरे. या संमेलनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून सारस्वतांनी आपला सहभाग नोंदवला. संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक,चित्रपट निर्माते आदरणीय श्री.शरद मधुकर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले सुप्रसिद्ध साहित्यिका मुंबई प्रदेशाध्यक्ष हिरकणी राजश्री बोहरा यांनी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषविले. सौ. अनिता गुजर यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित . संमेलनाचे विशेष मान्यवर अतिथी टी.डी.सी बँकेचे चेअरमन ,नगरसेवक श्री. बाबाजी बाळाराम पाटील उपस्थित होते. या संमेलनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध शिक्षिका,कवयित्री , निवेदिका सौ.मुग्धा मंगेश कुंटे यांच्या शैक्षणिक,साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या हस्ते शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ मुग्धा मंगेश कुंटे या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
डोंबिवलीतील एकनाथ बी. मढवी जुनियर कॉलेज येथे गेली सतरा वर्षे आयटी शिक्षिका म्हणून कार्यरत.
ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करतात.
अनेक ठिकाणी काव्य लेखन करून पुरस्कार संपादन केले.
गायन वादन नृत्य कला याची आवड जोपासतात.
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम बसवतात.
उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
आजवर अनेक ऑनलाईन,ऑफलाईन संमेलने राबवली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे विभागातून डॉ.बाबसाहेब आंबेडकर काव्यसंमेलनाचे आयोजन केले. सदर संमेलनात परिषदेच्या दिगग्ज व्यक्ती, आदरणीय रामदास आठवले साहेब व आदरणीय संजय राऊत साहेब यांची मोलाची उपस्थिती.