*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम गझल रचना*
*आनंदकंद वृत्त*
चिंता नसे कशाची स्वार्थात मग्न होते
बाहेर भरजरी पण आतून नग्न होते
स्वर्गातल्या सुखांना स्वप्नात पाहिलेले
सत्यात बंगलेही मोडून भग्न होते
लपवून अंतरीच्या इच्छा मनात साऱ्या
हर्षात गाजराला खाण्या निमग्न होते
डोळ्यात धूळ फेके साऱ्यास ज्ञात आहे
चोरीत साव चोरा संगे सलग्न होते
न्यायात गुंतलेला विस्तार रखडल्याने
आतून आज काही झाले विभग्न होते
©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६