मालवण
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘घर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जात आहे. या निमित्ताने रविवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मालवण येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाबद्द्ल सर्वांच्या मनात नितांत आदर आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्वातंत्र विरांचे स्मरण करणे तसेच मिळालेल्या खंडित स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेत आजच्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा अखंड भारताचा संकल्प करणे व आजच्या स्वतंत्र्य भारता समोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. यानिमित्ताने १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता मालवण एस टी स्टँड येथून दुचाकी वरून तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ, भरड मार्गे कुंभारमाठ येथे जाणार असून तेथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारका जवळ रॅली ची सांगता होणार आहे. तरी राष्ट्र प्रेमी नागरिकांनी तिरंगा रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.