बार्शी :
सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रिलायन्स फौंडेशन, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मल्टीलोकेशन ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.
मागच्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी पावसाचे आगमन मोठ्या प्रमाणात झालेले आहे . त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत . ज्या भागात थोडा फार पाऊस झाला आहे , तिथे चांगल्या प्रमाणात पेरण्या झाल्या असून काही भागात पेरणीसाठी पाऊस थांबण्याची प्रतिक्षा होती . त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत . त्यांनाही आणि ज्यांच्या पेरण्या राहिल्या आहेत , त्यांनाही उपयोग होईल या हेतून सोयाबीन पिक लागवडी नंतरील खत व्यवस्थापन याविषयावर शेतकऱ्यांना गुरूवारी ( दि . 4 ) ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव , साकत , उपले-दुमाला येथील सुमारे 45 ते 55 पुरुष शेतकरी मल्टीलोकेशन ऑडीओ कॉन्फरन्स द्वारे जोडले गेले होते . या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथील शास्त्रज्ञ डॉ . अमोल शास्त्री विषय विशेषज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी त्यांनी सांगितले की , एकात्मिक खत व्यवस्थापन कसे करावे , उत्पादकता कशी वाढवता येईल, खत शिफारस मात्र काय आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य कोणत्या टप्प्यात देणे गरजेचे आहे , तसेच सोयाबीन पिकावरील कीड व रोग फवारणीचे नियोजन यावर त्यांनी मार्गदर्शन केले . तसेच या कार्यक्रमासाठी रिलायन्स फौन्डेशनचे जिल्हा व्यवस्थापक तेजस डोंगरीकर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच या सर्व कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फौंडेशनचे कार्यक्रम समन्वयक आकाश जेऊरगी यांनी केले होते.