सावंतवाडी
आंबोली_गेळे वस्तीची बस उद्या संध्याकाळ पासून सुरू करण्याबाबत एस टी प्रशासनाने निर्णय घेतला असून तसे लेखी पत्र अनिल चव्हाण यांना दिले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करण्याबाबत मागणी होती.गेले काही दिवस बस नसल्याने तासिका चुकत होत्या.त्यामुळे गैरसोय झाली होती.याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी याबाबत उपोषणाचा इशारा दिला होता.आज याबाबत एस टी प्रशासनाचे व्यवस्थापक नरेंद्र बोधे, स्थानक प्रमुख संकेत पवार,रेषा सावंत,अरुण पवार,एस.बी.मुरमुरे यांच्याशी अनिल चव्हाण यांची चर्चा झाली.यावेळी आंबोली बस सुरू करण्याबाबत चे लेखी पत्र देण्यात आले.उद्यापासून रविवारी वस्तीला बस आंबोली गेळे येथे जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आता सोय होणार आहे.वेळेत पोहोचता येणार आहे.
सावंतवाडीतून आंबोली येथे उशिरा जाण्यासाठी आता ही बस उपयोगी ठरणार आहे.कणकवली आजरा बस नंतर उशिरा संध्याकाळी साडे सहा ते सात या दरम्यान ही बस याच रूट ने सोडण्याबाबत यावेळी अनिल चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यानुसार निर्णय घेण्यात आला.त्यामुळे सावंतवाडी तून आंबोली चौकुळ गेळे येथील लोकांना उशिरापर्यंत येण्याची सोय झाली आहे. एस टी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आंबोली वासियानी आभार मानले आहेत.