You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये मैत्री दिन उत्साह सोहळा साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये मैत्री दिन उत्साह सोहळा साजरा

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये आज शनिवारी शाळेच्या पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मैत्री दिन साजरा केला. तसेच या सोहळ्यासाठी नगरपालिकेतील समाजसेवेसाठी सदैव कार्यरत असलेले सेवाभावी सहकारी नारायण आंबेडकर, किरण कांबळे, चंद्रकांत कदम, दयाळ जाधव, गौरव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. शाळेचे संचालक रुजूल पाटणकर, मुख्याध्यापिका दिशा कामत, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व मदतनीस व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मैत्री दिनाच्या निमित्ताने शाळेला लाभलेले प्रमुख पाहुणे व शाळेतील कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित असलेल्या पाहुण्यांना व कर्मचाऱ्यांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्री दिन साजरा केला व शाळेतर्फे नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू म्हणून टोपी, मास्क, ग्लोवज देण्यात आले. याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापिका सौ दिशा कामत यांनी आभार प्रदर्शन द्वारा स्वच्छता बद्दलची माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी जीवदान विशेष शाळा झाराप ता. कुडाळ येथे भेट दिली व मैत्री दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक फादर सज्जी, मुख्याध्यापिका सिस्टर रोजा व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मंडळाचे सदस्या सौ. काश्मीरा रुजूल पाटणकर या लाभल्या होत्या. स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यात आले. त्यामध्ये नृत्य, गायन व रॅप असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

मैत्री दिनाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थिनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधले व चॉकलेट आणि बिस्कीट देऊन मैत्रीचे नाते घट्ट केले. तसेच स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल तर्फे मैत्री दिनाचे औचित्य साधून जीवदान या संस्थेस जीवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा