You are currently viewing मुलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करावे

मुलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करावे

युवराज लखमराजे भोसले

स्पर्धा जरुर असावी पण ती जीवघेणी असू नये. आपली आवड आणि ज्या क्षेत्रात करीयर करावयाचे आहे त्याबाबतची परिपूर्ण माहिती घेऊन आपलं क्षेत्र निवडल्यास आपल्याला निश्चितच यश मिळू शकत. नकारात्मकता दुर सारुन सकारात्मक विचार केल्यास या स्पर्धेच्या युगाततही नवनवीन मार्ग सापडतात असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे यांनी केले. मी राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी सर्वसामान्या सारखाच वागतो. आपल्या आयुष्यातील काही काळ हा सामाजिक कामासाठी दिला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्या वतीने बांदा हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते या कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविक संबोधनात चाईल्ड लाईनचे संचालक अॅड. नकुल पार्सेकर- यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे आज अनेक गंभीर सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या असून शालेय जीवनातच मुलं आपलं बालपण विसरून गेली असून मोबाईल हेच त्यांच विश्व बनलेल आहे. आपली भारतीय संस्कृती, परंपरा याचा त्याना विसर पडत आहे. आवश्यक त्या कामासाठीच मोबाईल वापरण्यासाठी मुलामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
मरीन क्षेञात रोजगाराच्या नवनवीन संधी असून योग्य संस्थेत प्रशिक्षण घेतल्यास आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास याही क्षेत्रात उत्तम करीअर करता येते. यासाठी जे मार्गदर्शन हवे असल्यास आपण द्यायला केव्हाही तयार आहोत असे प्रतिपादन मरीन अभियंता श्री प्रशांत सावळ यांनी केले. यावेळी अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक सौ. नमिता परब- यांनीही विचार मांडले.
सुरूवातीला सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सावंत, यांनी केले.यावेळी पर्यवेक्षक श्री नंदकिशोर नाईक, चाईल्ड लाईनच्या समन्वयक कु. पुनम पार्सेकर-, महिला समुपदेशनच्या समुपदेशक सौ. अर्पिता वाटवे, समुह सदस्य श्रीमती प्रज्ञा तांबे, प्रशालेचे शिक्षक व दोनशेहून जास्त विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. रश्मी नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा