स्थानिक कलाकारांना काम मिळण्याची केली मागणी
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या शुटिंग च्या घटनास्थळी जाऊन पत्रक दिले आणि आणि स्थानिक कलाकारांना काम मिळावे यासाठी मागणी केली.
*(१) तू तेव्हा तशी ( २ )ठिपक्यांची रांगोळी ( ३ )जीवाची होतिया काहिली*
या तिन्ही सिरीयलच्या EP ( Exective Producer ) यांची भेट घेतली आणि लोकस्वराज्यच्या मागणीला स्थानिक कलाकारांना काम देण्याच्या मागणीला पाठिंबा सुद्धा दिला आहे.
यावेळी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.प्रशांत खानविलकर, राष्ट्रीय सचिव श्री. जयेश निकम, प्रभारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.विशाल गवई आदी कलाकार उपस्थित होते.