सावंतवाडी
शहरातील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये भूगोल अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठ मुंबई व भूगोल विभाग श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने बी. ए. द्वितीय वर्ष भूगोल पेपर-२, पेपर- ३ या विषयाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमात संदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये असे आवाहन केले की, बदलत्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, नवीन संकल्पना येऊ घातलेल्या आहेत त्यानुसार आपण तयार असले पाहिजेत विद्यार्थ्यांना बहुश्रुत असे शिक्षण मिळावयास हवे तशाप्रकारे अभ्यासक्रम तयार करायला हवा जेणे करून आजचा विद्यार्थी हा येणार्या आव्हानांना तोंड देईल. तो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उभा राहील .
यावेळी मार्गदर्शक डॉ. आर. बी. पाटील, प्रा. एच. आर. यादव यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस प्रा. डॉ. आर. एन. काटकर, डॉ पी. डी. गाताडे, डॉ. वानखेडे, डॉ. आर. बी. राठोड, डॉ तेजस जयकर, प्रा. आर. डी. कांबळे, प्रा. शिंदे, प्रा. रिता ठाकूर, प्रा. डॉ. डी. जी. बोर्डे, प्रा. एम. बी. बर्गे, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी भूगोल विभाग प्रमुख तथा भूगोल अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ अध्यक्ष डॉ. एस. एस. ठाकूर यांनी सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. तर भूगोल विभागाचे प्रा. डॉ. एस. एम. बुवा यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यशाळेचे आभार प्रा. पूनम सावंत यांनी मानले.