जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर…
सिंधुदुर्गनगरी
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर गोरगरीब जनतेसाठी विशेष बाब म्हणून साखर, डाळ व तेल रास्त दरात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.
दि.३१ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात घरोघरी आस्थेने व निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गावोगावच्या रेशन दुकानांवर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका धारक गोरगरीब जनतेला विशेष बाब म्हणून प्रति कार्ड ५ किलो साखर, ५ किलो डाळ व २ लिटर तेल रास्त दरात पुरवठा करावा, अशी मागणी मनसेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव राजेश टंगसाळी,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच साखर,तेल व डाळ या साहित्यासोबतच सद्यस्थितीत प्रति महा देण्यात येणारे तांदूळ व गहू धान्याचा पुरवठा २७ ऑगस्ट पूर्वी जनतेला वितरीत होईल अशी व्यवस्था करणेबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात .अश्या मागणीचे निवेदन आज मनसेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे सादर केले.