सावंतवाडी
कै. विद्याधर शिरसाठ स्मृती प्रित्यर्थ,आरोस हायस्कूल आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार .नील नितीन बांदेकर याने, संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील या गटात एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते .
याच दिवशी केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या ,माझा आवडता क्रांतिकारक या वक्तृत्व स्पर्धेतही
नील बांदेकर याने प्रथम क्रमांक पटकावला.
त्याचबरोबर या स्पर्धेच्या तालुका पातळीवरील स्पर्धेतही नीलने प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित ,
माझा आवडता नेता, या वक्तृत्व स्पर्धेतही नील बांदेकरने
संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये
प्रथम क्रमांक पटकावून
नीलने यशाचा आगळावेगळा असा विक्रम केला.
नील ने आतापर्यंत हस्ताक्षर ,चित्रकला, कथाकथन, वक्तृत्व, मॉडेलिंग ,वेशभूषा ,गीत गायन यांसारख्या अनेकविध स्पर्धांमध्ये बक्षीसे पटकावलेली आहेत
या यशात नीलचे आई-वडील तसेच बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांचा अनमोल असा वाटा आहे.
बांदा केंद्र शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा गावचे सरपंच श्री अक्रम खान यांनी नीलचे विशेष कौतुक केले आहे. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे