चित्ररथ देखावे,भजने,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला आज गुरुवारी विठ्ठल नामाच्या अभंगांनी व टाळघोषात प्रारंभ करण्यात आला. सप्ताहाच्यानिमित्ताने मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर ब्रम्हवृदांच्या
हस्ते विधिवत पूजा करत गाऱ्हाणे घातले. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून घटस्थापनेस्थळी फुलाची सजावट करण्यात आली आहे.
यावेळी विविध पारांचे प्रमुख, मानकरी तसेच भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी भाविकांनी
दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
हरिनाम सप्ताहाचे दिन वितरण केले असून आज पहिला दिवस आंबेआळी मित्रमंडळ यांनी साई बाबांचा चमत्कार हा देखावा काढण्यात येणार असून ५ ऑगस्टला ढालकाढी मित्रमंडळ, तिसरा दिवस ६ रोजी जुना मोटार स्टँन्ड मारुती आळी, चौथा
दिवस ७ रोजी पटकीदेवी मित्रमंडळ, पाचवा दिवस ८ रोजी बिजलीनगर मित्रमंडळ,
सहावा दिवस ९ रोजी तेली आळी मित्रमंडळ, १० रोजी सातवा दिवस महापुरुष मित्रमंडळ, ११ ऑगस्टला सकाळी कणकवली शहरात नगरप्रदक्षणा व दुपारी महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सात दिवसाच्या कालावधीत मंदिरात भरगच्च भजन, चित्ररथ देखावे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे
आयोजन केले आहे. तरी या हरिनाम सप्ताहात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काशीविश्वेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.