सावंतवाडी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय क्रीडा समितीची वार्षिक सभा श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे संपन्न झाली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य व कोकण विभागीय क्रिडा समितीचे अध्यक्ष डॉ डी एल भारमल हे होते . प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारिरीक शिक्षण संचालक डॉ मोहन आमृळे उपस्थित होते . त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य डॉ जयवंत माने, विद्याधिराज शारीरिक शिक्षण महाविद्यालय पनवेलचे डॉ एस एस शिंदे ,विभागीय क्रीडा समितीचे सचिव व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा. सीए नाईक ,आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उपसचिव सी एस वी उपशेटे, कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा , क्रिडा तज्ञ व्यक्ती म्हणुन डॉ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे क्रीडा संचालक श्री जे वाय नाईक , रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक , क्रीडा शिक्षक प्रतिनिधी ,श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे क्रिडा समितीचे सदस्य डॉ जी एस मर्गज , प्रा. सौ सुनयना जाधव , श्री प्रदिप दळवी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने झाली. कोकण विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. सीए नाईक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले .प्रास्ताविक मुंबई विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य डॉ जयवंत माने यांनी केले .मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ मोहन आमृळे यांनी मुंबई विद्यापीठस्तरीय विविध खेळांची माहिती दिली ,यामध्ये विविध क्रीडा प्रकार स्पर्धा त्यांचे नियम त्यासाठी विद्यापीठाने जाहीर केलेला निधी या संदर्भात सविस्तर माहिती दिली . विद्यापीठ स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धांमध्ये कोकण विभागातील महाविद्यालयीन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा यांचे स्थळ निश्चित करण्यात आले. कोकण क्रिडा समिती अध्यक्ष डाॅ. डी एल भारमल यांनी आपले अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले व विविध क्रिडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जी एस मर्गज केले व आभार मानले.