You are currently viewing मी एक कवयित्री

मी एक कवयित्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठान लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*🌹मी एक कवयित्री 🌹*

*मी एक कवयित्री फक्त कविता लिहिते*
*अलीकडे बसून पलीकडे पाहते*
*भुतकाळ माझा वर्तमान ही माझा*
*पाण्यासारखी भविष्याकडे वाहते*

*कष्टकऱ्यांचे दुःख शब्दातून मांडते*
*शेतकऱ्यांच्या हक्का साठी भांडते*
*गोरगरीबांची भुक आणि तहान*
*ऊखळात कल्पनेच्या मुसळाने कांडते*

*प्रेमातील विरहाचा बघते मी आकांत*
*प्रियकर प्रेमिका मला दिसतात अशांत*
*त्यांचीही आसक्ती कागदावर चितारते*
*गर्दीतही त्यांना मिळवून देते एकांत*

*संस्थेला ज्यांच्या मिळत नाही अनुदान*
*त्यांच्या ही त्रासाचे काढते मी अनुमान*
*जिथे तिथे पुढे असते लेखणी घेऊन*
*सन्मान स्विकारते गिळून घेते अपमान*

*आयुष्य सारे माझ्या देशासाठी झिजवते*
*भ्रष्टाचार पेटवून शिष्टाचार शिजवते*
*देशद्रोहाची समाजात लागलेली आग*
*राष्ट्रवादाच्या पाण्याने कायमची विझवते*

*मी कवयित्री माझे शब्द सारे शस्त्र*
*कविता माझी एकमेव अस्त्र*
*शत्रूंचा नायनाट करण्यासाठी मित्रांनो*
*शब्द माझे बनतात प्रसंगी अण्वस्त्र*

 

✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा