कणकवली :
ई पिक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन २ मध्ये पिकपाणी नोंद महसुल विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे डंगळवाडी येथे ई – पीक पाहणी नोंद प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला. त्यात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सहभाग घेत तेथील शेतक-यांना महसुल विभागामार्फत नोंदीचे प्रात्यक्षित देत माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी “जिल्ह्यातील शेतक-यांनी या नवीन ई पिक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन २ या अँपवर जाऊन आपल्या सातबा-यावर पिकांची नोंद करणे आवश्यक आहे.” तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पिक विमा योजना व अन्य कामासाठी त्याचा उपयोग शासन करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना या ॲपचा वापर करुन पिक पाहणी नोंद करावी. शेतक-यांना सांकेतिक क्रमांक अन्य काही अडचणी असल्यामुळे थेट मदतीसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येईल. त्या अँपवर व्हिडिओ, ऑडिओ माहितीसाठी उपलब्ध आहेत. गावातील तरुणांनी शेतक-यांना मदत करुन सहकार्य करावे. जिल्ह्यातील १०० टक्के सातबारांवर पिक पाहणी नोंद झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवार, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार आर. जे. पवार, मुख्य समन्वय बाजीराव कार्शीद, मंडल अधिकारी विलास चव्हाण, वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, वागदे तलाठी मंगेश जाधव, शिरवल तलाठी अर्जुन घुनावल, ओसरगाव तलाठी अमरेश सातारकर, कळसुली तलाठी सरिता बावलेकर, वागदे ग्रामसेवक युवराज बोराडे, शेतकरी मंगेश आमडोस्कर, ललित घाडीगांवकर, शिरीष घाडीगांवकर, नागेश आमडोस्कर, नरहरी आमडोस्कर, रमेश आमडोस्कर, संदेश बागवे, अरविंद परब, अमोल आमडोस्कर, रुपाली बागवे, विलास आमडोस्कर, कोतवाल भाऊ येंडे, सखाराम गांवकर आदींसह वागडे गावातील शेतकरी उपस्थित होते. वागदे गावचे शेतकरी मंगेश आमडोस्कर यांच्या सातबा-यावर पिक पाहणी नोंदीचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आले. शेतकरी मंगेश आमडोस्कर म्हणाले, पिक पाहणी नोंदीसाठी जिल्हाधिकारी आमच्या शेतीच्या बांधावर आल्या. चांगल्या प्रकारे आम्हा शेतक-यांना त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्य़ा सातबा-यावर स्वत : च नोंदीसाठी सोयीचे होईल.