राज भवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
मालवण (मसुरे) :
मसुरे गडघेरा वाडी येथील सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभूगावकर यांना भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बीइए अवॉर्ड्स 2022 हा अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार नुकताच राजभवन येथे माननीय राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एन ए एफ ए आर डी चेअरमन डॉलर पटेल, जनरल सेक्रेटरी शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशन आणि परवाज मीडिया ग्रुप यांच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वीस महनीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मसुरे गावचे सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभूगावकर यांना देशाचे वाढते व्यक्तिमत्व या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत उदित नारायण, बी अब्दुल्ला यानाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशिष प्रभूगावकर यांनी देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. उद्योग, सामाजिक, कामगार,कला, क्रीडा विविध क्षेत्रात देशामध्ये भरीव अशी कामगिरी केली आहे.त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन देशातील मानाचा असा भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड्स 2022 साठी त्यांची निवड करण्यात आली. आशिष प्रभूगावकर हे मसुरे गावचे सुपुत्र असून मसुरे गावच्या सामाजिक, कला क्रीडा धार्मिक, व्यापार, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे भरीव असे योगदान आहे. माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभूगावकर यांचे ते सुपुत्र आणि माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांचे ते बंधू आहेत. देश पातळीवरील या पुरस्कारा बाबत आशिष प्रभूगावकर यांचे मसुरे गावात विशेष कौतुक होत असून लवकरच त्यांचा युथ फाउंडेशन मसुरे च्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी बोलताना आशिष प्रभुगावकर म्हणालेत या पुरस्काराने आपली जबाबदारी आणखीन अधिक वाढली असून यापुढेही देशाला आदर्श असेच सर्व क्षेत्रात कार्य करेन.