You are currently viewing बांदा येथील रॉयल कॅश्यूचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले…

बांदा येथील रॉयल कॅश्यूचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले…

६० हजाराचे काजू लंपास;  जनतेने सावध राहावे, अक्रम खान…

बांदा

शहरात महामार्गावार असलेल्या रॉयल कॅश्यूचे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून आतील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ५० किलो काजुगर लंपास केलेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. सरपंच अक्रम खान यांनी याठिकाणी येत पाहणी करत शहरातील जनतेला चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक चौकशी केली. मात्र दुकान मालकाने तक्रार करण्यास नकार दिल्याने या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा