*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ती माणसं आता भेटत नाही !*
घास अडकला की
थांब म्हणणारी
श्वासात उरलेला श्वास
मुखांत भरवणारी
ती माणसं आता भेटत नाही……!
काळजाची माती खोदून
गाव वसवणारी
बिया पेरून
रोप जगवणारी
ती माणसं आता भेटत नाही ……!
देहबुध्दीच्या आरश्यात बघणारी
मुखवट्यांत राहून दीर्घ श्वास घेणारी
एका वेदनेसाठी!हसत राहणारी
स्वतःच चरीत्र!दावणीला बांधणारी
ती माणस आता भेटत नाही …..!
या मातीत रक्त सांडूनही
सिंहासनाला लाथ मारणारी
सत्तेच्या मखराला झिडकारून
मुकुटाला काढून फेकणारी
ती माणस आता भेटत नाही….!
जन्म कमी पडेल!की काय या भीतीने
सारे क्षण दुस-यांच्या करता जगणारी
अन् उरलेच!जरी कांही क्षण तेही
क्षणार्धात ईनामात देत!निघून जाणारी
ती माणस आता भेटत नाही…!!
बाबा ठाकूर