You are currently viewing भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्स च्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २०२२ आरवली येथे संपन्न

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्स च्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २०२२ आरवली येथे संपन्न

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था (रजि) व सतर्क पोलीस टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ जुलै २०२२ रोजी साळगांवकर मंगल कार्यालय, आरवली, ता- वेंगुर्ला येथे इयत्ता १० वी व १२ वी च्या शालान्त व उच्च माध्यमिक शालांन्त परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून ऊत्तीर्ण झालेल्या मुलांमुलींचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२१-२२ हा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात रेडी, शिरोडा व आरवली या गावात वास्तव्य करणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात रेडी, शिरोडा व आरवली गावात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकी एकूण १० व १२ वी मध्ये सर्वोत्तम गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत व्यासपीठावर बोलावून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास अतिथी म्हणून बा.म. गोगटे कनिष्ट विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक पांडुरंग कौलापुरे त्याचप्रमाणे संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर, केतन चव्हाण, निलेश राणे, चंद्रकांत साळगावकर, भूषण मांजरेकर, बाळा जाधव, महादेव मराठे यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या एकूण ६५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आरवली गावातील कुमारी तिलोत्तमा अर्जुन शेलटे – ९८.६०% सर्वोत्तम गुण प्राप्त करून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आली. त्याचप्रमाणे कुमारी.सेजल संजय भुबे- ९३.८०% व कुमारी दर्शना दत्तात्रय प्रभुआजगावकर या आरवली गावातून प्रथम तीन विद्यार्थीनी सर्वोत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्याचप्रमाणे १२ च्या परीक्षेत कुमारी. इशा शशिकांत लाड -८९.५०% , कुमारी. सानिया संतान सोज ८८.८३% व कुमारी. ब्लेसिया नेपोलिन जेशल ८३.००% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. रेडी, शिरोडा व आरवली गावात सर्वोत्तम गुण संपादित करून ऊत्तीर्ण झालेल्यां मध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती.

संस्थेच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असलेले अतिथी प्राध्यापक पांडुरंग कौलापुरे, संस्थेचे कोकण विभाग सल्लागार कृष्णा मराठे यांच्यावतीने त्यांचे बंधू महादेव मराठे यांचा व सूत्रसंचालन करणारे रंगकर्मी बाळा आपटे गुरुजी यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार होता. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांची भेट असल्याने त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. व.पो.नि. अतुल जाधव यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमास फोनवरून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. वपोनी अतुल जाधव यांचे संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी गुणगौरव सोहळा यशस्वी व्हावा याकरिता संस्थेचे आयोजन समिती पदाधिकारी सौ.कमल पडवळ, सौ.तृप्ती साळगावकर, सिद्धेश शेलटे, आबा चिपकर, बाळा जाधव, सौरभ नागोळकर, राजेश सातोसकर, रविंद्र राणे, अरुण कांबळी, बाबल शेलटे, दया कृष्णाजी, मुरलीधर राऊळ, दिलीप साळगावकर, नेपोलिन जेराळ, रामचंद्र गावडे यांनी मेहनत घेवून सहकार्य केले याकरिता तसेच गुणगौरव सोहळ्यास उपस्थित असलेल्या विध्यार्थी व पालकांचे संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी सर्वांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा