You are currently viewing कन्या

कन्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांनी लाडकी पुतणी मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली शुभेच्छापर काव्यरचना*

*कन्या*

एक गोड परी हवी,
प्रत्येकाच्या घरोघरी
सुख समाधान हास्य
येते घेऊन ती दारी

शोभा वाढते घराची
तिच्या खेळ खेळण्याने
खुश राही घर सारं
तिच्या त्या बागडण्याने

स्पर्धा असो वा परीक्षा
नेहमीच असे पुढे
आई बापाच्या डोळ्यांत
आसवंही तीच काढे

असे जोवरी ती घरी
बरसती धुंद सरी
चिंती सुख माहेराचं
गेली जरी ती सासरी

उर भरे तो बापाचा
ठेवे डोकं छातीवरी
आशिर्वाद देतो बाप
हात ठेवी डोईवरी

तिच्या आठवणी जुन्या
जपे आई-बाप उरी
येता माहेरास कन्या
अश्रू गळे गालावरी

*वाढदिवस मैथिलीचा…*
आमच्या घरचं पहिलं फुलपाखरू,
जिच्या नुसत्या असण्यानेच घर दणदणत असतं,
खळखळत असतं…
मुली गोंडस असतात,
लळा लावतात, हक्क गाजवतात,
बाप असो, चुलता असो,
आजोबा असो वा भाऊ…
आई, काकी, बहिणी वर
जीवापाड प्रेम करतात,
कदाचित कधीतरी ह्या सगळ्यांना परकं करून दुसऱ्याच्या घरी जाणार ही जन्मताच त्यांना जाणीव असावी..!
तशीच आमची मैथिली….!!!
गोड गोजिरी,, हवीहवीशी वाटणारी,
चुणचुणीत बोलणारी,
ऐकणारा थकेल पण ही न थकणारी…
आज तिचा वाढदिवस…
तिच्या वाढदिवशी कुलदेवता श्री देवी माऊली चरणी विनम्र प्रार्थना…. तिला उदंड आयुष्य नी उत्तम आरोग्य दे… तिच्या सर्व इच्छा आकांक्षा, मनोकामना पूर्ण होवोत, हीच सदिच्छा…!!!
वाढदिवस अभिष्टचिंतन…!!!💐🎂🎂💐

*(दीपि)*
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा