*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गजलकार श्री.अरविंदजी ढवळीकर लिखित अप्रतिम गझल रचना*
*हरलो तरी*
मी आतां कधिही पुन्हा हे बोलणार नाही
हरलो तरीही डाव रडिचा खेळणार नाही
दाटुनी आले कधिचे बरसण्याचे नांव ना
फिरुनी आतां उंची ढगांची मोजणार नाही
तो छंद अस्मानी तसा स्पर्शातले ते चांदणे
ते दान स्वप्नांचे पुन्हा तुज मागणार नाही
ते चंदनाचा गंध ल्याले हात तव हातातले
घाव पण तसले फुलांचे मी सोसणार नाही
अर्धाच उरला जन्म हा अर्धेच ते ही चालणे
थकलो तरी आतां कुणा मी थांबणार नाही
जाहले तितुके पुरे हे श्वास मजला राहू दे
नांव त्या दरबारी तुझे मी सांगणार नाही
अरविंद १६/४/२०