सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख
सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सी.एन.जी. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या भरमसाठ दरवाढी विरोधात 1 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारने इंधनावर लावलेल्या भरमसाठ करांमुळे इंधानाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालक यांना व्यवसाय करणे फार अडचणीचे झाले आहे. 2014 पर्यंत मनमोहनसिंग सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर प्रचंड वाढलेले असताना सुद्धा त्यावेळीच्या केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी ठेवून इंधन दरवाढ आटोक्यात ठेवली. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोल वरील अबकारी कर 9.48 रुपये आणि डिझेलवरील अबकारी कर 3.56 रुपये होता. मोदी सरकारच्या काळात हा कर कितीतरी पटीने वाढवण्यात आला आहे हा सर्वसामान्य जनतेच्या खिश्यावर मोदी सरकारने घातलेला दरोडा आहे. एका बाजूला हे केंद्र सरकार मोठ्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्जे माफ करत आहे. कंपन्यांवर लागणारा कॉर्पोरेट टॅक्स कमी करत आहे केंद्र सरकारच्या कृपेने अनेक ठग बॅंकांची कर्जे घेऊन फरार होत आहेत तर केंद्रातील हे मोदी सरकार सर्वसामान्य जगण्यासाठी वापरत असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून देशातील गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम करत आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्यांचे उत्पन्न कमी होत आहे त्यामुळे सामान्यानी जगायचे कसे?
केंद्रतील मोदी सरकार हे मोठ्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे त्यांना गोरगरिब जनतेचे काही सोयरसुतक नाही सामान्य जनता जगली काय आणि मेली काय मोदी सरकारला काही फरक पडत नाही फक्त मोदींच्या उद्योगपती मित्राची संपत्ती दिवसेंदिवस वाढली पाहीजे यासाठीच हे सरकार काम करत आहे अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली.