You are currently viewing नोकरीसाठी पैसे घेणारा स्वतः पैसे देण्यासाठी येणार…

नोकरीसाठी पैसे घेणारा स्वतः पैसे देण्यासाठी येणार…

संवाद मीडियाच्या बातमीनंतर उमटले पडसाद

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वसूल करून दिले पैसे..

कणकवली येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींकडून पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत आरोग्य विषयक योजना गावागावात पोचविण्यासाठी डाटा ऑपरेटर आणि तालुका समन्वयक भरतीसाठी कोल्हापूर येथील दोघांनी ट्रेनिंगसाठी म्हणून प्रत्येकी ५०००/- रुपये प्रमाणे असे २२५ जणांकडून जमा करून घेतले. सरकारी योजनेअंतर्गत भरतीसाठी पैसे उकळत असल्याची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी भरती करण्याचे व पैसे भरून घेण्याचे लेखी आदेश आहेत का? याबाबत चौकशी केली असता, तशा प्रकारचे लेखी आदेश नसल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

सदर प्रकरणी पोलीस चौकशी होताच ज्यांनी प्रशिक्षणासाठी पैसे घेतले ती शिंगाडे नामक व्यक्ती स्वतः पैसे देण्यासाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नोकरीला लावतो असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मुलांकडून पाच पाच हजार घेतले होते ते पैसे आज नगरपंचायत मध्ये आपण त्यांना देणार असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले. सदर व्यक्तीने प्रथम ७५ मुलांचे पैसे द्यायचे असल्याचे सांगितले होते, परंतु नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी खोलवर चौकशी केली असता ११२ जणांचे पैसे द्यायचे असल्याचे समजले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ११२ मुलांचे पैसे वसूल करून दिल्याची माहिती दिली.
संवाद मीडियाने नोकरीच्या आमिषाने झालेल्या फसवणुकीबाबत काल संध्याकाळीच आवाज उठवला होता. आज सकाळी संपादकीय मधून जिल्ह्यातील वारंवार घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकला होता. संवाद मीडियाच्या बातमीनंतर फसवणुकीच्या घटनेवर पडसाद उमटले आणि ११२ मुलांचे पैसे वसूल झाले. सदर व्यक्तींकडे डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि तालुका समन्वयक पदांसाठी भरती करण्याचे रीतसर आदेश आहेत की नाही याबाबत खुलासा झालेला नाही, परंतु ज्याअर्थी ५०००/- रुपये परत दिले त्याअर्थी पैसे घेतले ही चूकच असल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा