महारक्तदान शिबिराला १७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
बांदा
बांदा शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदीर बांदा व सिंधुरत्न रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे उदघाटन क्रिएटीव्ह मँन्युफँक्चरींग प्रा.लि. वाफोली,पै काणे ग्रुपचे मँनेजर संदिप रेडकर, बांदा आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डाँ. जगदीश पाटील, डाँ.अविनाश पटवर्धन,पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव देसाई, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर,बांदा सरपंच अक्रम खान,बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी,माजी जि.प.सदस्या सौ.श्वेता कोरगावकर,उमेष परब लोकमान्य मल्टिस्टेट बांदा शाखा व्यवस्थापक, मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष साईप्रसाद काणेकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी, सचिव राकेश केसरकर, श्रीप्रसाद वाळके,हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थाचा सन्मान करण्यात आला.यामध्ये शालांत परीक्षा बांदा शहरात प्रथम क्र. कु.युती वसंत राऊळ,द्वितीय क्र.कु. रिध्दी महेश तळगावकर,त्रुतीय क्र.कु.वैष्णवी गोविंंद भांगले, उच्च माध्यमीक परीक्षा प्रथम क्र. कु. प्राजक्ता मुकुंद डुगल,द्वितीय क्र. कु. अथर्व प्रदीप देसाई,तुतीय क्र.विभागून कु. आर्या मंगलदास सांळगावकर, कु.अथर्व श्रीकांत महाबळ यांचा मंडळाच्या वतीने तसेच मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाच्या वतीने सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांचा रक्त मित्र या उल्लेखनीय कामगीरी बद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या महारक्तदान शिबीरात १७२ रक्तदात्यानी रक्तदान केले . महीला वर्गाचाही चांगला प्रतीसाद लाभला.गोवा मेडीकल काँलेज बांबोळी गोवा व एस. एस. पी. एम. मेडीकल काँलेज आणि लाईफ टाईम हाँस्पीटल पडवे यांच्या टिमने महत्वाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.रूपाली शिरसाट यांनी केले,तर प्रास्ताविक सचिव राकेश केसरकर यांनी व आभार शेवटी अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी मानले.