जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन.
सावंतवाडी
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग यांनी एक पाऊल अजुन पुढे नेत कलंबिस्त येथे ए.टी.एम. बरोबर क्यु.आर. कोड सुविधेचेही उदघाटन जिल्हा बँकेचे चेअरमन मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सैनिक नागरी सहकारी बँकेचे चेअरमन शिवराम जोशी,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ, जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र मडगावकर,कॅप्टन दिनानाथ सावंत, कलंबिस्त गावचे सरपंच शरद नाईक, वेर्ले गावचे सरपंच सुभाष राऊळ, शिरशिंगे गावचे उपसरपंच पांडुरंग राऊळ, सैनिक नागरी बँकेचे संचालक कॅप्टन सुभाष सावंत, परब सर,लवू भिंगारे,बाबुराव कविटकर, मोहन राऊळ सर, चंद्रकांत राऊळ, दिपक शांताराम राऊळ, विलास राणे, नारायण राऊळ, अनंत सावंत, संगुण पास्ते, भास्कर कोचरेकर,सैनिक स्कुलचे सचिव दिपक राऊळ, रामा म्हाडगुत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे,सुहास सावंत, राजेश पास्ते, शशिकांत पाटकर, सैनिक पतसंस्था कलविस्तचे शाखा व्यवस्थापक महादेव माळकर, पंचक्रोशितील माजी सैनिक, पंचक्रोशितील ग्रामस्थ, संस्थेचे कर्मचारी पिग्मी एजेंट, तसेचे सरकारी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात लिंगोजी राऊळ,संतोष वर्दम,संतोष लाड, संदीप वर्दम,आंतोन लॉडिक्स, राजेंद्र जाधव, गणपत राणे, महेश पास्ते, रिमा पवार, अशोक राऊळ, अनिल सावंत यांना क्यू आर कोड प्रदान करण्यात आले.
जिल्हा बँक, सैनिक पतसंस्था, सह्याद्री फांउडेशन यांच्या मार्फत आयोजित कृषि मेळाव्यात शेती विषयक योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी भागिरथ प्रतिष्टानचे अध्यक्ष श्री डॉ. देववर यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,
यावेळी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक झाड मेळाव्यात वितरीत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदेश गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष सावंत यांनी केले.