रिलायन्स फाउंडेशन, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ राळेगाव तसेच तहसील विभाग राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३० जुलै 2022 रोजी या पूर परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प दरम्यान धानोरा ,दापोरी कासार या दोन्ही गावातील जनावरांना लसीकरण, औषधोपचार,जंत व गोचीड निर्मूलन, खनिज मिश्रण वाटप इत्यादी बाबीवर कार्यक्रमादरम्यान भर देण्यात आला.
यावेळी दोन्ही गावातील 437 जनावरावर उपचार करण्यात आले. यामध्ये गाई 30, बैल 63 ,महेश 3, शेळ्या 341, या दरम्यान प्रमुख उपस्थिती श्री. सचिन मेश्राम पशुधन पर्यवेक्षक, डॉ. एन बी नवरे पशुधन पर्यवेक्षक, मनीष खेडकर परिचर, नयन कोकाटे, समीर जमनाके, प्रकाश भेदुरकर, कानकेश्वर शेंडे, मयूर जीवतोडे, सौरभ भोरे, तसेच श्री प्रमोद आंबटकर, पोलीस पाटील दापोरी कासार , सौ दीक्षा पुरुषोत्तम मून सरपंच धानोरा तसेच रिलायन्स फाउंडेशनचे मारुती खडके कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र राज्य, श्री प्रफुल बनसोड, श्री तेजस डोंगरीकर, श्री राजेश कांबळे, जिल्हा व्यवस्थापक तसेच श्री अमोल श्रीरामे श्री शेखर कडू रिलायन्स फाउंडेशन सहकारी तसेच ऋतुजा मेश्राम यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. तसेच उमेद प्रकल्पातील पशु सखी, राळेगाव यांनी सुद्धा या कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले.