शिक्षक भारतीने जिल्ह्यासह व राज्यभर छेडले आंदोलन
तळेरे
उत्तर प्रदेशातील हाथरस मधील निष्पाप मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी,हाथरसच्या बेटीला न्याय मिळायला हवा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने आज जिल्ह्यासह, राज्यभर ‘एक दिवा पेटवून’ आंदोलन छेडण्यात आले आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्यासह प्रशांत आडेलकर, सुरेश चौकेकर, सी.डी.चव्हाण, समिर परब, हेमंत सावंत, अनिल लोके, माणिक खोत, सौ.सुष्मिता चव्हाण यांच्यासह शिक्षक भारतीचे तालुका-जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, बहुसंख्येने सभासद सहभागी झाले होते.
शिक्षक भारतीच्या महिलानीच नव्हे तर सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी राहतात त्या परिसरात सोसायटीतील महिलांना, नागरिकांना एकत्रीत करुन, सोसायटीत, चौकात, उंबरठ्यावर, खिडकीजवळ शनिवारी सायंकाळी 6 वा. एक दिवा पेटवून माणुसकी काळिमा फासणा-या या भ्याड कृतीचा आणि जाहीर निषेध करीत न्यायाची जोरदार मागणी केली आहे.तसेच “हाथरस की बेटी हमारी बेटी” हा हॅशटॅग वापरुन व हातात निषेधाचे फलक घेत हे आंदोलन छेडले आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.