वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ गावातील “कांदळवन” समिती यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी “कडोबा” कांदळवन संवर्धन बचत गट स्थापन करुन यंदाच्या वर्षी कांदळवन संवर्धनामध्ये प्रभावी कार्य करुन व्यवसाय निर्माण केला या प्रभावी कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धनामध्ये त्यांचा “प्रथम” क्रमांक आला .
दोन दिवसापूंर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून त्यांना १ लाखाचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन या गटाचा सन्मान करण्यात आला होता.
या वेंगुर्ला तालुक्यातील प्रथमच विशेष कार्याबद्दल भाजप वेंगुर्ला तालुकाच्या वतीने आज गुरुवार दि.२८ जुर्ले २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता सागरतीर्थ टांक (गांबीत वाडी) येथील विठ्ठल मंदिरामध्ये “कडोबा गट” या ग्रुपचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे सूत्र संचलन व आभार आसोली येथील भाजप ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश रेगे यांनी केले .
कांदळवन समितीचे निकेश प्रभू यांनी “कडोबा गट” यांनी कांदळवन संवर्धन मध्ये केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली .
त्यानंतर या विशेष सत्कारासंदर्भात भाजप,सिंधुदूर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी कडोबा गटाचे कौतुक करुन , पर्यावरण संवर्धनामध्ये केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले . तसेच भविष्यात कांदळवन सफारी सुरू करुन पर्यटन व्यवसायात सुद्धा भरारी घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या .
यावेळी भाजप,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर,उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे व मनवेल फर्नाडिस , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , आरवली सरपंच तातोबा कुडव , आसोली,रेडी शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर व जगन्नाथ राणे , सागरतीर्थ बुथप्रमुख देवेंद्र उर्फ बाळू वस्त , सागरतीर्थ भाजप पदाधिकारी अनुराधा मोठे , दिपमाला आचारी , सचिन वस्त , भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी , भाजप शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत , भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर , शिरोडा ग्रामस्थ महेश न्हावेलकर हे मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते सागरतीर्थ कांदळवन समिती अध्यक्ष खिस्तू सोज ,सदस्य – राधाकृष्ण पेडणेकर ,निकेश प्रभू ,”कडोबा” कांदळवन संवर्धन बचत गटाचे सचिव निलेश प्रभू , सदस्य – राजन मोंडकर , सुहास मोंडकर , प्रभाकर मोंडकर , बेजमी फर्नाडिस , प्रसाद आचरेकर , राजन चोपडेकर ,निवृत्ती तांडेल , आदित्य तांडेल , सुनिल चोपडेकर , सुचित चोपडेकर , बाबाजी आरोदेकर , रघुनाथ मोडंकर ,नरेश तांडेल , नंदकिशोर गवंडे , रेजिनाल्ड फर्नाडिस यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला . त्याच प्रमाणे वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर व भाजप,जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते वरील विशेष कार्याबद्दल “कडोबा” कांदळवन संवर्धन बचत गटाचे अध्यक्ष नरेंद्र मोंडकर यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .