*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जयराम मोरे लिखित अप्रतिम गझल रचना*
*आनंदकंद वृत्त*
शोधू नका कुणाच्या दस्तीत यार हो
आहे खुशाल माझ्या कश्तीत यार हो
आभाळ राहिले ना ना गाव राहिले
जगतो तरी सुखाच्या मस्तीत यार हो
श्रध्दा असेल मनी जर हमखास भेटतो
आहे अगाध शक्ती भक्तीत यार हो
भरमार योजनांची आहे जरी इथे
जनता तरी उपाशी वस्तीत यार हो
होते तिचे दिवाने येथे कितीतरी
कळले फिरून सारे गस्तीत यार हो
चुरगाळले कळ्यांना त्यांनीच आश्रमी
झाले कसे जगी ते अर्चीत यार हो
उलटून जिंदगीचे पुस्तक बघा जरा
मिळतील उत्तरे मग वांच्छीत यार हो
*जयराम मोरे सोनगीर*