You are currently viewing जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव

जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव

ओरोस बुद्रुक, शिरगाव, नाटळ, नांदगाव यांचा समावेश;नाटळ व शिरगांव महिलांसाठी राखीव

ओरोस

जिल्ह्यातील ओरोस बुद्रुक, नांदगाव, शिरगाव व नाटळ हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाले असून यातील शिरगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. ५५ पैकी २८ मतदार संघ महिलांसाठी राखीव असून यातील ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाले आहेत.

तर सर्वसाधारण महिलांसाठी १९ मतदारसंघ राखीव राहिले आहेत. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मठपती व अन्य अधिकारी उपस्थित होते. आराध्या या चिमुकलीने चिठ्ठीद्वारे अनेक काही मतदार संघाचे आरक्षण काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 20 =