अनुसूचित जाती साठी प्रथमच आरक्षण
वेंगुर्ले : वेंगुर्ले पंचायत समितीच्या एकूण 12 जागांसाठी आज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. या 12 जागांमध्ये अनुसूचित जाती एक जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन व खुली एक जागा तर सर्वसाधारण मध्ये चार महिला व चार खुल्या जागांसाठी हे आरक्षण करण्यात आले. वेंगुर्ले तहसील कार्यालयातील चिट्ठीद्वारे काढण्यात आलेल्या पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणामध्ये परुळे : सर्वसाधारण महिला, म्हापण सर्वसाधारण महिला, वायंगणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, आडेली सर्वसाधारण, मठ सर्वसाधारण, तुळस सर्वसाधारण महिला, मातोंड सर्वसाधारण, आसोली अनुसूचित जाती खुला, उभादांडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मोचेमाड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शिरोडा सर्वसाधारण आणि रेडी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. वेंगुर्ले हायस्कूलची भैरवी घाडी आणि शिवाजी प्रागतिक स्कूलची आराध्या चव्हाण या विद्यार्थिनींनी चिठ्ठी उचलत आरक्षण सांगितले. निवडणूक प्राधिकरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उपेंद्र तांबोरे यांच्या उपस्थितीत तहसीलदार प्रवीण लोकरे निवडणूक नायब तहसीलदार संदीप पाणमंद यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.