You are currently viewing सवाल जवाब

सवाल जवाब

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना*

*सवाल जवाब*
( एक वेगळा प्रयत्न)

ती: अरे पाहतेच मी सवाल करता
कसा सामना करशिल ते
अन तोडुन तारे अकलेचे तू
कसा जवाबा देशिल ते ….. ..माझ्या राजा
तो: अग नको दाखवू मिजास आधी
सवाल देवुन पहा तरी
अकलेचे वाजले दिवाळे
तुझे तुला समजेल तरी ………….माझे राणि
ती: ऎका….
जगा मधि रे सर्वां साठी
दूर काय तू सांग जरा
उत्तर याचे सुचले ना तर
दूर तुझा होईल नखरा…………. माझ्या राजा
तो: अग तुला वाटते सुर्य चंद्र मी
देईन उत्तर थांब जरा
कान देवुनी ऎक सत्य तू
भूतकाळ हा दूर खरा …………… माझे राणी
तो: सवाल माझा ऎक आतां तू
नकोस जाऊ गडबडुनी
जगि टोंकदार सर्वात काय?
सांग नुसते न जमे ग बडबडुनि……माझे राणी
ती: अरे धार सुरीची तलवारिची
टोंकदार कुणि म्हणतिल रे
पण जिभे वाचुनी टोंकदार
जगि दुसरे कांही नाही रे………….. माझ्या राजा
ती: ऎक शहाण्या सवाल माझा
तुझि पडेल बुद्धी छोटि रे
जगा मधे तू सांगतोस का
गोष्ट कोणती मोठी रे? ……………माझ्या राजा
तो: छोट्या तोंडी बात हि मोठी
करायची तुज संवय पहा
पृथ्वी, पर्वत, याहुन मोठी
हांव माणसाचीच पहा …………… माझे राणि
तो: अखेरचा हा सवाल पुसतो
हरशिल तू होईल हंसे
सांग मर्दिनि माणसास जगि
सर्वात जवळचे कोण असे? ………माझे राणी
ती: आई, वडिल, मुलगा, पत्नी
पती सर्व ही जवळ खरे
एक कशी मी सांगू राजा
हरले तू तरि सांग खरे ………. माझ्या राजा
तो: उत्तर देतो दु: ख नको ग
मृत्यु जवळचा सर्वात
हरलो नाहि कुणिही आपण
सांगतसे घे लक्षात ‌‌‌……………माझे राणी
ती: कसे?
तो: गोष्ट जगा मधि सोपी कोणती?
उत्तर वदले बुद्धांनी
जे जे ठावे आपणांस ते
ईतरांस सांगणे सर्वांनी …ग ग ग…माझे राणी
ती: खरंच माझ्या राजा
तो: हो ना माझे राणी

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा