पुणे :
श्री साई प्रतिष्ठान वडगाव शेरी, पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय भाऊ चौधरी हे ‘एकेक वही मोलाची’ हा उपक्रम दरवर्षी घेतात यावर्षी त्यांनी आमच्या शाळेला म्हणजे अरण्येश्वर विद्या मंदिर, सहकार नगर, पुणे ०९ या शाळेला ५०० वह्या दिल्या आहेत. केवळ त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देवून साहित्य दिले . त्यांच्याबरोबर माननीय माने सर व ममता जैन या दोन ट्रस्टींना घेऊन आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्या मुलांना ५०० वह्यांचे वाटप करण्यात आले .
“जिथे जिथे जाई, तिथे तिथे साई” हे संस्थेचे घोषवाक्य आहे. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम नेहमीच राबवण्यात येतात.
मा.संजय सरांना समाजगौरव, आदर्श समाजसेवक, म. गुणगौरव इत्यादी ५० पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. विविध विषयावर यांची २० पुस्तके प्रकाशित आहेत. या वर्षी यांनी आमच्या शाळेला शै.साहित्य वाटप केले.
अरण्येश्वर शाळेतील मा. मुख्याध्यापिका अनिता गायकवाड व डाॅ. सौ. भावना जोशी व शिक्षक मनिषा इरकल बाई, बोरसे बाई, पाठक बाई, वसुधा नाईक व विद्यार्थि उपस्थित होते.
वसुधा नाईक, पुणे
अरण्येश्वर विद्या मंदीर,सहकारनगर ,पुणे ०९
मो.नं. 9823582116