वेंगुर्ले
देशाच्या शुर सैनिकांच्या शौर्याचे , पराक्रमाचे आणि बलिदानाच प्रतीक म्हणून कारगील विजय दिवस साजरा केला जातो . कारगील विजय दिवस स्वतंत्र भारताच्या प्रत्येक देशवासियांसाठी महत्वपूर्ण आहे . याच दिवशी भारत आणि पाकिस्तान मध्ये १९९० मध्ये कारगील युद्ध झाले व जवळ जवळ ६० दिवस हे युद्ध सुरु होते आणि २६ जुलै रोजी हे युद्ध भारताने जिंकले , त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे . म्हणुनच या दिवशी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाते .
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने दरवर्षी कारगील विजय दिनानिमीत्त माजी सैनिकांना त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात येतो व त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात येतो .
ह्यावर्षी सुध्दा भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकुर यांच्या हस्ते *नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवनकर* यांचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला . संतोष चेंदवनकर हे १९९४ साली सैन्यात दाखल झाले , त्यांनी राजस्थान , जम्मू काश्मीर व पंजाब याठिकाणी २५ वर्षे देशसेवा केली .तसेच दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी नायब सुभेदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले . त्यांनी संपूर्ण सेवाकाल आर्मड कोअर मध्ये घालवला . यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर , परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब , महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस , रविंद्र शिरसाठ , ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत व कृतीका साटेलकर , बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर , रुपेश ठाकुर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .