सावंतवाडी
वर्षा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटक सुविधा कराच्या नावाखाली कुठल्याही सुविधा न देता कर आकारून आंबोलीसह गेळे ग्रामपंचायत परगावच्या पर्यटकांसह स्थानिक पर्यटकांची लुटमार करत असल्याचे उघड होत आहे.
ग्रामीण पर्यटनस्थळांत येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा मिळण्यासह ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे या हेतून शासनाने पर्यटक सुविधा कर आकारण्यास मुभा दिली आहे.या अनुषंगाने पर्यटकांकडून कर आकारून त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे.मात्र आंबोली ग्रामपंचायतीने पर्यटकांना कुठल्याही सुविधा न देता पर्यटक कर आकारणी सुरू केली आहे.यात पर जिल्ह्यातील पर्यटकांसह स्थानिक पर्यटकांचाही समावेश आहे.
याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनी २०१७ च्या आदेशानुसार आपण कर आकारणी करीत असल्याचे सांगीतले. त्यावर आपण कोणत्या सुविधा दिल्या असे विचारल्यावर त्यांची ततफफ झाली सरपंच नार्वेकर आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला वनखात्यामुळे सुविधा देता येत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना पर्यटकांना सुविधा देता येत नाही तर मग कर का आकारता असे विचारले असता उत्तर देता आले नाही.
आंबोली गावचे सरपंच हे स्वतः ठेकेदार आहेत.गावातील रस्त्यांची अवस्था पण दयनीय आहे.हिरण्यकेशी रस्ता गायब झाला आहे. देवस्थान स्थळी सुलभ शौचालय ही नाही आहे.जे होते त्याला लॉक लावण्यात आले आहे.
काही ग्रामस्थांनी तर हा मोठा झोल असल्याचे सांगितले. किती पावत्या ख-या आणि खोट्या असतील याची गँरेंटी नाही. याचा हिशोब मागून आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आणि किती खर्च झाली हे पाहण्याची मागणी होत आहे.
आंबोली सरपंच स्वतः ठेकेदार असल्याने ग्रामपंचायत काराभाराबाबत संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान आमच्याच भागात फिरण्यासाठी पैसे का द्यावे असे प्रश्न जिल्ह्यातील नागरिक विचारत असून प्रशासनाच्या कारभारा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.