You are currently viewing ग्रामपंचायत कलम ४५

ग्रामपंचायत कलम ४५

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती संस्थापक अध्यक्ष सांगली जिल्हा अहमद मुंडे लिखित लेख

ग्रामपंचायत ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय माणले जाते. सर्व ग्रामीण विकास योजना याचं माध्यमातून राबविल्या जातात. विविध दाखले त्यासाठी ठराविक शासन निर्णयानुसार फी हे सुद्धा शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे घेतली जाते. गावात ग्रामसेवक. तलाठी. मंडलधिकारी. हे काम बघतात
गावातील लोकांच्या विविध जीवनावश्यक प्रश्नावर कलम ४५ नुसार काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हे ठरविण्यात आले आहे
(१) सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न जेव्हा पिण्याचे पाणी कोणत्याही ओढ्यातून. तलावातून. गाव विहीर मधून. किंवा अन्य पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करून हे पाणी जर दुषित असेल त्यापासून लोकांना विशिष्ट रोग होण्याची संभावना असल्यास किंवा आरोग्यास अपाय होण्याचा संभव असेल. तर अशा पध्दतीने पाणी काढून नेण्यास किंवा त्याचा उपयोग करण्यास बंदी घालणे हे कलम ४५ नुसार केलें जाते. शक्य असेल तर असे दुषित पाणी पुरवठा करणारे ‌तलाव विहीर. बुजवून टाकून त्यांच्यावर आच्छादन घालून किंवा योग्य वाटेल अशा कोणत्याही पध्दतीने ते पाच; अशा रीतीने काढून नेण्यास किंवा त्याचा उपयोग करण्यास बंदी करणे.
(२) लोकांचे आरोग्य सुख किंवा सोय यांना हाणी पोहचेल अशा रीतीने व अशा ठिकाणी खत. कचरा . किंवा इतर दुषित दुर्गंधी युक्त पदार्थ ठेवण्यास किंवा टाकण्यास किंवा साठवन करण्यास कलम ४५ नुसार बंदी घालण्यात आली आहे.
(३) उपद्रव कारक अजिविकाचे किंवा उदिमाचे विनियमन करणे
(४) गावातील बेवारस प्रेताचे दहन अथवा दफन धर्मानुसार करणे. अथवा योग्य विल्हेवाट लावणे. अशी तरतूद ग्रामपंचायत कलम ४५ मध्ये करण्यात आली आहे
(५) गावातील लोक किंवा अन्य कोणीही घर बांधणी कारणावरून माती मुरूम उत्खनन करुन विनाकारण जागोजागी खड्डे किंवा लोकांना उपद्रव कारक असणारे लोकांना नाहक त्रासाला कारणीभूत ठरणारे खड्डे खळगे भरून काढून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तरतूद करणे
(६) गावात मोकळं भुखंड पडकी घर यावर पाऊसाळयात झाडे झुडपे वाढून विविध किटक तयार होतात आणि त्यांच्यापासून लोकांना विविध प्राणघातक रोगांना सामोरे जावे लागते त्यासाठी ती सर्वे साफसफाई करणे किटकनाशक औषध फवारणी करणे
(७) गावातील धोकादायक घर मोडकळीस आलेल्या इमारतींची संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्या दुरुस्त करुन घेण अथवा पाडून टाकणे
(८) गावांचा विकास गावांचा शहरांशी संबंध यासाठी रस्ते हे फार महत्वाची जबाबदारी बजावितात. गावात ग्रामपंचायत रस्ते व गटर यासाठी पुरेसी जागा सोडल्याशिवाय घरं बांधण्यास परवानगी देणे कलम ४५ नुसार बंदी आहे
(९) गावांसाठी जत्रा. बाजार. यातून ग्रामपंचायतीला कर गोळा होत असतो आणि त्यातून गावांचा विकास साधला जातो. यासाठी या कत्तलखाने. गाडीतळ. यांचेही व्यवस्थित विनियमन लावले जाते
(१०) प्रत्येक गावात विविध खाद्यपदार्थ यांची सुरेख आणि देखणी जाहिरात केली जाते आणि आपले खाद्यपदार्थ विकले जातात विविध पेयं सुध्दा गावांत शहरात विक्री केली जातात. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत यांनी या सर्व खाद्यपदार्थ यांची लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो यासाठी तपासणी पडताळणी निरिक्षण करण गरजेच आहे. यातील काही खाद्यपदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असतील तर त्यांचा नाश करणे गरजेचे आहे
(११) गावातील रस्ते गटारे दिवाबत्ती. सरकारी दवाखाना. अंगणवाडी. रेशन दुकान. पेन्शन योजना. यासाठी व्यवस्थित तरतूद करण ही बाब कलम ४५ चे विचाराधीन आहे
(१२) स्वच्छता व साफसफाई.यांचे सर्वसाधारण विनियमन करणे आणि मेलेल्या जनावरांची प्रेत यांची व्यवस्थित विल्हेवाट लावणे अशीही तरतूद कलम ४५ मध्ये करण्यात आली आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − five =