कळसुली-शिवडाव येथील त्या वादग्रस्त ९ क्रशर मालकांचे धाबे दणाणले, बंदी संदर्भात नोटीसा
“प्रदूषण नियंत्रण बोर्डने क्रशर बंद का करू नयेत ?” असा जाब विचारणाऱ्या बजावल्या नोटीसा
तब्बल दहा मुद्द्यावर प्रदूषण नियंत्रण बोर्डने काढल्या नोटीसा
कळसुली-पिंपळेश्वर,उल्हासनगर आणि शिवडाव ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला आलेले यश
कळसुली आणि शिवडाव या दोन गावात तब्बल नऊ क्रेशरचा सुरू आहे हैदोस
कणकवली
कणकवली तालुक्यातील कळसुली आणि शिवडाव या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या नऊ क्रेशरच्या मालकांना महाराष्ट्र प्रदूषण नियमक बोर्डाने कारणे दाखवा नोटीसा बजावले आहेत. क्रेशरला परवानगी दिलेल्या अटी शर्तींचे पालन केले नसल्यामुळे, क्रेशर पर्यावरणाचा ऱ्हास करतात,जनतेच्या आणि प्राणी मात्रांच्या जीवितास हानी करतात. त्यामुळे हे क्रशर बंद का केले जाऊ नयेत अशा स्वरूपाच्या नोटीसा प्रदूषण बोर्डाने बजावल्या आहेत. या नोटिसांमुळे क्रशर मालकांचे धाबे दणाणले असून येथील जनतेने केलेले आंदोलन आणि सातत्य पूर्ण केलेला पाठपुरावा याला यश आले आहे.
कणकवली तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात कळसुली आणि शिवडाव या दोन गावात ९ क्रशर सुरू आहेत. या क्रशरमुळे हवा,पाणी दूषित झालेलेआहे. अमोनियम चा स्फोटासाठी वापर केला असल्याने हानी होण्याची शक्यता आहे. अनेक प्राण्यांचे जीव गेलेले आहेत. पाळीव प्राण्यांना त्या भागात सोडणेही कठीण झालेले आहे. घरांना तडे गेलेले आहेत, अनेक मातीची घरे कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडे येथील ग्रामस्थांनी वारंवार केल्या होत्या. ग्रामपंचायतच्या ग्रामसभा मधून या क्रशर विरुद्ध बंदीचा ठराव करून प्रदूषण बोर्डाला पाठवला आणि सरकार दप्तरी सातत्याने पाठपुरावा या गावच्या ग्रामस्थांनी केला होता.अखेर ग्रामस्थांच्या या लढाईला यश आले. महाराष्ट्र प्रदूषण बोडाने जनतेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या नऊही क्रशर मालकांना नोटीस बजावली आहे.
या सर्व क्रशरना कायदा, 1974 आणि वायु (पी आणि सीपी) कायदा, 1981 आणि धोकादायक कचरा (व्यवस्थापन हाताळणी आणि ट्रान्सबाउंड्री मूव्हमेंट) नियम, 2008 मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई का केली जाणार नाही याचे कारण दाखविण्याचे निर्देश दिले आहेत. तुमच्या युनिटविरुद्ध कारवाई केली जाईल. असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे
प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी दिले आहेत.दरम्यान प्रदूषण मंडळाने या क्रेशरच्या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामावर आक्षेप घेत तब्बल दहा प्रकारचे मुद्दे आपल्या नोटीसित नमूद केले आहे.त्यामुळे या सर्वांची पूर्तता केली नाही म्हणून क्रशर बंद करण्याची आता प्रदूषण महामंडळाची टांगती तलवार आहे.
दरम्यान प्रदूषण बोर्डाने 22 जानेवारी 2020 व 20 जून 2022 अशा दोन वेळा भेटी दिल्या आणि संबंधित क्रेशरची पाहणी केली त्यात अनेक मुद्दे प्रदूषणाला हानी पोहोचवणाऱ्या आहेत त्यातील दहा मुद्द्यांवर नोटीसा बजावल्या आहेत.
१. तुम्ही G.L/M.S शीट कव्हर आणि स्प्रिंकलरच्या उभारणीसह प्रदूषण नियंत्रणाचे पुरेसे उपाय दिलेले नाहीत.
२.. तुम्ही निर्माण होणारी धूळ दाबण्यासाठी कव्हर आणि पाणी शिंपडण्याची व्यवस्था पुरवलेली नाही. मटेरियल हँडलिंग/लोडिंग/अनलोडिंग ऍक्टिव्हिटी
३. तुम्ही स्क्रीन क्लासिफायरला कव्हर दिलेले नाही.
४. तुम्ही सर्व बेल्ट कन्व्हेयर्सना G.I./M.S. शीट कव्हर दिलेले नाही.
५. वाऱ्याच्या वेगामुळे हवेतील धूळ उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी आवारातील जमिनीच्या पातळीतील धूळ दाबण्यासाठी तुम्ही रस्ता नियमित ओला करण्याची तरतूद केलेली नाही
६. तुम्ही आवारात मेटलेड रॅम्प आणि ऍप्रोच मेटलेड रस्ते दिलेले नाहीत.
७. तुम्ही विशेषत: चार्जिंग हॉपर, क्रशिंग ठिकाण आणि स्टोन क्रशिंग युनिटच्या आजूबाजूला विंड ब्रेकिंग वॉल/पडदा दिलेला नाही.
८. सर्व बाजूंनी किमान ५ मीटर रुंदीचा क्रशर परिसर. झाडाच्या पानांनी सुमारे २० मीटर उंचीपर्यंतचे क्षेत्र पुरेसे कव्हर केले पाहिजे.
९. तुम्ही स्टोन क्रशरच्या प्रवेशद्वारावर सर्व्हे नंबर, मालक आणि युनिटचे नाव आणि पत्ता दर्शविणारा डिस्प्ले बोर्ड दिलेला नाही.
१०. स्टोन स्क्रीनिंग/क्रशिंग/ग्राइंडिंग इ. मुळे निर्माण होणाऱ्या बारीक धुळीसाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावलेली व्यवस्था प्रदान केलेली नाही.असे हे मुद्दे आहेत.