वेंगुर्ला
वनसंवर्धन दिनानिमित्त वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी ‘घनवन वृक्षलागवड’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिसव, खैर, आवळा, काजू वगैरे वेगवेगळ्या स्थानिक प्रजातीच्या सुमारे 550 रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, सचिन काकड, अभिषेक नेमाणे, प्रीतम गायकवाड, अभि गिरप, पंकज केळुसकर, विठ्ठल सोकटे, निशा आळवे, श्वेता रेडकर, प्रा. गायकवाड, बॅ. खर्डेकर कॉलेजचे 58 बटालियन तसेच नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. येणाऱ्या कालावधीत शहरातील कंपोस्ट डेपो, वेंगुर्ला स्टेडियम तसेच इतर मोकळ्या जागा आधी ठिकाणी अडीच ते तीन हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असल्याचे मुख्याधिकारी डॉ.अमित कुमार सोंडगे यांनी सांगितले.