You are currently viewing बांदा केंद्र शाळेत रेड डे साजरा

बांदा केंद्र शाळेत रेड डे साजरा

बांदा

जिल्हा परिषद बांदा नं.1केंद्र शाळेत विद्याप्रवेश या कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी रेड डे उत्साहात साजरा करण्यात आला.

गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्या व बालवाडया बंद होत्या .अध्ययन प्रक्रियेमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या मुलांची अध्यनप्रक्रिया आनंदाने होऊन सर्व मुलांना‌ शाळेची गोडी लागावी यासाठी चालूवर्षी पहिलीत दाखल झालेले विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत तीन महिन्यांसाठी विद्याप्रवेश हा शाळापूर्वतयारी उपक्रम राबवण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
रंग कोपरा बनवूया या उपक्रमांतर्गत शाळेत रेड डे साजरा करण्यात आला यामध्ये पहिलीचे विद्यार्थी सहभागी झाले होते या दिवशी‌ विदयार्थ्यांनी लाल रंगाचे वेश‌ परिधान केले होते. तसेच‌आपल्या घरातील लाल रंगाच्या वस्तू आणून सजावट केली होती.
विद्यार्थ्यांना विविध रंगाची अनुभूती देण्याबरोच विदयार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करणेसाठी विद्याप्रवेश उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी आवडीने सहभागी होत‌ असल्याचे मत वर्ग शिक्षक श्री जे.डी.पाटील‌‌ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा