You are currently viewing मोबाईल ॲपद्वारे पिक पाहणी करा; मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचे प्रतिपादन

मोबाईल ॲपद्वारे पिक पाहणी करा; मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचे प्रतिपादन

मालवण (मसुरे) :

 

महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले असून आपल्या मोबाईल मधून एका ॲप द्वारे पिक पाहणी करावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या ॲपचा वापर करून जास्तीत जास्त ग्रामस्थ, शेतकरी यांना विनंती आहे की, त्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन मसुरे मंडल अधिकारी श्री. सुहास चव्हाण यांनी मसुरे मर्डे ग्रामपंचायत हॉल येथे बोलताना केले.

मसुरे-मर्डे ग्रामपंचायत हॉल येथे मसुरे मंडळ अधिकारी श्री.सुहास चव्हाण यांनी ई-पिक पाहणी ॲप बाबत एका कार्यशाळेत माहिती दिली. या वेळी बोलताना सुहास चव्हाण म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणी च्या नोंदी आपल्या गावाला नेमण्यात आलेल्या तलाठी मार्फत ह्या नोंदी तलाठी करत असायचे परंतु आता महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले आहे. या ई पीक पाहणीचा चा अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेतीतील पिकांची पाहणी करणे होय. या ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची पाहणी करून त्याची नोंद ही ई पीक पाहणी या ॲप वर करायची आहे.

या वेळी सदरची पिक पाहणी ई-पिक पाहणी अपद्वारे कशी करायची याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच या ई- पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना कर्जाची आवश्यकता पडल्यास, त्यांना पीककर्ज सुद्धा मिळविण्यासाठी या ई- पीक पाहणी मुळे सुलभता येईल. तसेच एखाद्या वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान झाले जसे पूर, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले तर या ई- पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना योग्य मदत मिळेल. तसेच या ई-पीक पाहणी मुळे राज्यामध्ये चालू वर्षी कोणत्या प्रकारचे पीक शेतकऱ्यांनी जास्त लागवड केली, तसेच कोणत्या पिकाची लागवड किती केली याचे अचूक क्षेत्र हे ई- पीक पाहणी मुळे कळणार आहे.आणि या मुळेच आपल्या राज्यातील आर्थिक पाहणी करणे आणि कृषी या क्षेत्राचे योग्य नियोजन करणे हे आता शक्य होणार आहे. त्याच प्रमाणे यावर्षी पासून पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी उपयोग होणार आहे.

यावेळी भगवान जाधव, शरद मोरे, एस.आर.कांदळकर तलाठी देऊळवाडा, एस.आर.चव्हाण कोतवाल देऊळवाडा, एस.ए.नाईक कोतवाल माळगाव, एस.जे.चव्हाण कोतवाल मसुरे, व्ही.डी.पोयरेकर कोतवाल त्रिंबक, शैलेश मसुरकर ग्रामपंचायत लिपिक मसुरे- मर्डे,नारायण पांचाळ, प्रीतम जाधव, राजेंद्र जाधव, कौडीव्य पवार, महेश जाधव, निखिल जाधव, सुदर्शन मसुरकर, महेश खोत, विनोद मोरे, ठाकूर, वैभवी पेडणेकर, आदेश बागवे, लवकिक भोगले, खुशी परब, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी मंडल अधिकारी चव्हाण यांनी मोबाईल द्वारे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच कोणत्याही शेतकरी ग्रामस्थ याला काही अडचण आल्यास त्वरित मसुरे मंडल अधिकारी किंवा संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा