You are currently viewing रोटरी क्लब आणि जनकल्याण समिती यांचा स्तुत्य उपक्रम….

रोटरी क्लब आणि जनकल्याण समिती यांचा स्तुत्य उपक्रम….

डॉ. योगेश नवांगूळ हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन काॅन्सनट्रेटर मशीन लोकार्पण सोहळा संपन्न

कुडाळ

खर तर सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात रोटरी क्लब आणि जनकल्याण समिती ने अनेक ठिकाणी समाजहिताच कार्य करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आज लोकार्पण दिनाच अवचित्य साधून रोटरी क्लब कुडाळ आणि जनकल्याण सामाजिक समिती कुडाळ यांच्या संयुक्त विध्यमान कुडाळ येथील नावांगूळ हॉस्पिटलमध्ये सेवाभावी सवस्थेच्या माध्यमातून कोविड 19 च्या रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा देणारी यंत्रणा भेट देऊन पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी च दर्शन घडविल आहे. जेणे करून कोरोना महामारी च्या या काळात बऱ्याच ठिकाणी खाजकी किंवा सरकारी आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर (ऑक्सिजन)च्या अभवा मुळ सेवा देताना बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात परंतु रोटरी क्लब आणि जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने याकरिता लागणारी म्हणजे रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा 3 ऑक्सिजन काॅन्सनट्रेटर मशीनी देण्यात आल्या. या यंत्रणेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रणा रूग्णाला ऑक्सिजन सिलेंडर शिवाय निसर्गातील हवेतील ऑक्सिजन अखंडित पुरवठा करते आणि हाताळायला एकदम सोपी जे रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांनाही अत्यंत महत्वाची आहे आणि या मशीन्स मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नवांगूळ यांनी यावेळी दिली. यावेळी सचिन मदने -अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कुडाळ, डॉ योगेश नवांगुळ – अध्यक्ष जनकल्याण समिती सिंधुदुर्ग, प्रणय तेली – असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट 3170, महेश कुडाळकर – अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र संचलित रूग्णोपयोगी साहित्यसेवा केंद्र कुडाळ यांच्या हस्ते फित कापुन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
रोटरी क्लब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती महाराष्ट्र यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळं जिल्ह्यातील अनेक गरीब अथवा कुठल्याही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल हे निश्चित झालं आहे.

यावेळी या लोकर्पण सोहळ्याला सचिन मदने -अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कुडाळ, डॉ योगेश नवांगुळ – अध्यक्ष जनकल्याण समिती सिंधुदुर्ग, प्रणय तेली – असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट 3170, महेश कुडाळकर – अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र संचलित रूग्णोपयोगी साहित्यसेवा केंद्र कुडाळ, डी बी देसाई – शहर इन्व्हेस्टमेंट सल्लागार , गजानन कांदळगावकर – रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअरमन रोटरी 3170, अभिषेक माने – सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ कुडाळ, अमित वळंजू – खजिनदार रोटरी क्लब ऑफ कुडाळ, शशिकांत चव्हाण, डि के परब, रवींद्र परब, सदस्य रोटरी क्लब ऑफ कुडाळ गीतांजली कांदळगावकर सदस्या इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ देव कुडाळेश्वर भजन मंडळाचे सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, विलास बाक्रे जनकल्याण समिती कुडाळ चे सदस्य समिरा प्रभू, श्रीधर गोरे, राहूल जोशी, मुकुंद सप्रे उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा