You are currently viewing कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूल – १२वी च्या परीक्षेचा १००%निकाल

कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूल – १२वी च्या परीक्षेचा १००%निकाल

सी.बी.एस ई.बोर्ड १२वीच्या परीक्षेत सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

 

कुडाळ :

कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित सेंट्रल स्कूलच्या सीबीएसई बोर्ड बारावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. .यामध्ये समीप प्रफुल्लकुमार शिंदे 88.80% मिळून मिळून प्रथम, आदित्य संजय कांबळे 85 टक्के गुण मिळवून द्वितीय ,तर सुजल सुशील परब 80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

कुडाळ येथील बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल हे सिंधुदुर्गातील पहिले विनाअनुदानित सीबीएसई स्कूल आहे. त्यांची ही पहिली १२वी ची बॅच २०२१-२२या शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाली होती. बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तम गुणाानुक्रमे पास झाले.

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल च्या बारावीच्या या पहिल्या बॅचने उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था पदाधिकारी, यांनी सर्व विद्यार्थ्यांंचे, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, पालकांचे, अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा