You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी तोरसकर कुटुंबीयांचे केले सांत्वन

आमदार नितेश राणे यांनी तोरसकर कुटुंबीयांचे केले सांत्वन

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांना मातृशोक

कुडाळ

कुडाळ येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या मातोश्री सुलभा गणपत तोरसकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी भेट देवून भारतीय जनता पार्टीचे आमदार, युवा नेते नितेश राणे यांनी तोरसकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे,जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आणि प्रहार चे पत्रकार संतोष राऊळ, रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार रवी गावडे, नगरसेवक निलेश परब, राकेश कांदे,अक्षय तोरसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा