ओबीसी समाजाचे नेते भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव नामदेव चव्हाण,भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे होते उपस्थित
कणकवली
महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण काल शिंदे-फडणवीसांच्या महायुती सरकारमुळेच पुन्हा मिळवून देत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखविले आहे महाराष्ट्र राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यानंतर राज्यात सर्वत्र जल्लोष होत आहे. भाजप महायुती सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सर्वत्र अभिनंदन होत आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असणारे आमदार नितेश राणे यांची भाजप भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आमदार राणे यांचे आभार मानले. यावेळी ओबीसी समाजाचे नेते भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव, आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय कणकवली तळेरे गावचे रहिवाशी नामदेव चव्हाण,भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, लोकसभा संघटक वसंत चव्हाण, बाळकृष्ण खरात, राजू शिंदे, श्री गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांच्या निवडी बद्दल दोघांनाही आमदार नितेश राणे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.भटके विमुक्त आघाडीच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या कामाबद्दल आढावा देत असताना त्यावर आमदार राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांच्या कार्यप्रणालीवर आमचा पूर्ण विश्वास आहे एक उत्कृष्ठ भाषणशैली असलेले शांत व अभ्यासू नेतृत्व भटके विमुक्त आघाडीचे आमच्या पक्षाकडे आहे.त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा असून तुम्ही सर्वांनी एकजुटीने काम करा करावे, लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला देऊ असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला.