स्वप्न
जिवनातून माझ्या एक सुखद रात्र गेली
हाकेला माझ्या तिने साथ दिली
दिव्याची जरा मंद मी वात केली
तिच्या डोळ्यातल्या प्रकाशाने रात्र उजऴली
तिचे सूर माझे गीत गट्टी चागंली जमली
जणू संगीत मैफिलीलाच सुरवात केली
प्रेमाची चढली धुंद धुंद नशा
मार्गाला नव्हती आमच्या दिशा
नभातून परी आली पाहूनी आम्हा खुदकन हसली
देवानी आम्हावर पुष्पाची उधळण केली
पहाटे जेव्हा जाग आली
स्वप्न होते याची जाणीव मला झाली।
इर्शाद शेख
9404598091
सौ. राधिका भांडारकर यांनी विंदांच्या झपाटलेल्या मुशाफिराचे अगदी सार्थ रसग्रहण केले आहे.
त्यांची अभ्यासू वृत्ती त्यांच्या लेखनांतून नेहमीच दिसते.