मुंबई : स्नेहा नाईक
२ दिवसांपूर्वी डोंगरी बाजारातील मासेविक्री करणाऱ्या कोळीभगिनींना परप्रांतीय मासेविक्रेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत न्याय मिळावा याकरिता या कोळीभगिनींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन न्याय मिळण्याबाबत विनंती केली होती. राज ठाकरेंनी याची तत्पर दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व वाहतुक सेना अध्यक्ष संजय नाईक यांना या कामात लक्ष घालून त्या कोळीभगिनींनी न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले.
राजसाहेबांचा हा आदेश शिरसावज्ञ मानून संजय भाईंनी ताबडतोब संबंधित पोलीस अधिकारी,महापालिका अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून या समस्यांग्रस्त कोळीभगिनींनी २४ तासांच्या आत न्याय मिळवून दिला. याबद्दल या कोळीभगिनींनी काल कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांचे आभार मानले व त्याचवेळी संजय भाईंच्या धडक कार्यवाहीचे कौतुक केले.