*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री वंदना दर्यापुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निलयबाधा*
मुकुंदाच्या विरहांत
झुरते वेडी राधा
ग निलयबाधा
यमुनेकाठी.
जळ कालिंदीचे
स्तब्ध रुपेरी चंद्ररात्री
नितळ गात्री
शिरशिरी.
भास मोहनाचे
मोहोर अंगांगी फुलला
चांदणंचुरा सांडला
जलपात्रीं.
वाजतो पावा
दूर तिथे वेळूबनांत
कुजबुज कानांत
अनिलाची.
कृष्णवेडी राधा
इथे उभी बावरलेली
जरा सावरलेली
कदंबातळीं.
*वंदना दर्यापूरकर अमरावती*
